जानव, सोवळे नसल्याने भाजपच्या माजी खासदाराला राम मंदिरात प्रवेश नाकारला

0
33

दि .८ ( पीसीबी ) – देवळीतील राम मंदिरात भाजपचे माजी खासदार रामदास तडस हे सपत्नीक दर्शनासाठी गेले असता त्यांना चक्क मंदिरातील पुजाऱ्यांनी अडवल्याचा प्रकार घडला आहे. गावात राम नवमीची धुमाधाम सूरू असतांना रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस तसेच काही भाजप पदाधिकारी हे राम दर्शनास या मंदिरात पोहचले. त्यावेळी पूजा सूरू होती. मूर्तिच्या पूजेसाठी तडस हे गर्भ गृहात शिरत असतांना पुजाऱ्याने त्यांना रोखले. तुमच्याकडे जानव आणि सोवळे नसल्याने तुम्हाला मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच रहा, असे बजावले.
माजी खासदा तडस यांनी त्याबाबत खेद व्यक्त केला. ते म्हणाले, गेली ४० वर्षे या मंदिराच्या गर्भगृहात जाऊन मी दर्शन घेतो आणि नंतर माझे काम सुरू होते. पुणे शहरात राहणारा पुजारी वर्षातून एकदाच येतो. इथे ट्रस्टी आणि पुजारी यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. मंदिराची २०० एकर जमीन असून मोठा घोटाळा आहे. कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. आता आमच्या आमदारांनी या मंदिर ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी कऱण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी याच शहरातील राम मंदिरात हरिजनांना प्रवेश नाकारला होता, त्यावेळी स्वतः महात्मा गांधी यांनी पुढाकार घेतला आणि मंदिराचा प्रवेश खुला केल्याचा इतिहास याच गावाला आहे.