जाती एकमेकांच्या अंगावर घालायचे बंद करा, मराठ्यांचा अपमान करू नका – मनोज जरांगे

0
308

आंतरवाली सराटी, दि. ३१ (पीसीबी) – आज रात्रीत सांगा. २००१ च्या कायद्यनुसार मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या. तुम्ही दिलेल्या वेळेनुसार वेळ दिलाय. मराठ्यांचा अपमान आणि छळ सहन करू शकत नाही. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, उद्या संध्याकाळपर्यंत अधिवेशन घ्या अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आमची नाही, सरकारची राहील, असे इशारा मनोज जरांगे दिला आहे. जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

सरकारने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. त्यामुळे रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही, तर मी जलत्याग करणार आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा, असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मराठ्यांच्या तरुणावर खोटे गुन्हे दाखल करु नका. महाराष्ट्र शांत आहे. सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर जाऊन बसेन. त्यावेळी १० लाख किंवा ५ लाख मराठा समाज येईल हे सांगता येत नाही. मी बीडला आल्यास मराठा समाजाची ताकद समजेल, असं मनोज जरांगे म्हणाले.

आम्हाला एकटे पाडण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे, पण आम्ही ५० टक्के आहोत. नुसते मराठेच नाहीत तर आमच्या बाजुने धनगर, प्रकाश आंबेडकर, ग्रामिण ओबीसी, मुस्लिम आहेत. जे व्हायचे असेल ते होऊन जाऊ देत. जर का निर्णय घेतला नाहीच तर उद्या पासून मी पाणी घेणेसुध्दा बंद करेल आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल असा इशार जरांगे यांनी दिला.