जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एकावर गुन्हा

0
697

चिखली, दि, ०९(पीसीबी) – मुख्याध्यापकाला शिवीगाळ करू नको, असे सांगितल्याच्या कारणावरून एकाने जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना मोरे वस्ती चिखली येथील श्री शिवछत्रपती विद्यालयात शनिवारी (दि. 8) दुपारी घडली.

अविनाश वसंत पवार (वय 36, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मधुकर दशरथ काळे (रा. रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी पवार हे त्यांच्या प्रशासकीय कामासाठी मोरेवस्ती, चिखली यिीोल श्री शिवछत्रपती विद्यालय येथे आले होते. त्यावेळी तिथे आलेला आरोपी काळे हा मुख्याध्यापकांना उद्धटपणे बोलून वाद घालत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला तू मुख्याध्यापकांशी नीट बोल, असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करीत म्हणाला की तू विनाकारण नाक खूपसू नकोस, तसा तुलाही माज आला आहे. तू बाहेर येत बघून घेतो, अशी पुन्हा शिवीगाळ करीत धमकी दिली. सहायक पोलीस आयुक्‍त कोपनर तपास करीत आहेत.