जाणीवपूर्वक लावलेल्या आगीत दोन कारसह पाच वाहने जळाली

0
673

चऱ्होली, दि. ८ (पीसीबी) – जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमध्ये दोन कारसह पाच वाहने जळाली आहेत. ही घटना शनिवारी (दि. 6) मध्यरात्री तनिष पर्ल चऱ्होली येथे घडली.

नितीन शिवाजी जवक (वय 33, रा. तनिष पर्ल सोसायटी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवेंद्र गोपाळ तापकीर (रा. चऱ्होली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवेंद्र तापकीर याने तनिष पर्ल सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकीचा पेट्रोलचा पाईप काढून वाहनांना आग लावली. त्यामध्ये तीन दुचाकी, दोन कार जळून 10 लाख 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच इमारतीचे प्लास्टर, ड्रेनेज पाईपलाईन जळून त्याचेही नुकसान झाले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.