जाणकार,मुत्सद्दी राजकारणी हरपलातात्या कदम यांना महापालिकेत श्रद्धांजली

0
5

पिंपरी, दि. 17 (पीसीबी) – दिवंगत माजी महापौर तात्या कदम हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे द्वितीय महापौर होते. सन १९८८ ते १९८९ या कालखंडांत त्यांनी शहराचे नेतृत्व केले. शहराच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, त्यांच्या निधनाने शहराच्या इतिहासाचा जाणकार,मुत्सद्दी राजकारणी हरपला आहे अशा शब्दांत उप आयुक्त भदाने यांनी त्यांचेप्रती श्रध्दांजली अर्पण करून त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त निलेश बधाने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल अनिल कु-हाडे, अभिजीत सांगडे, वसंत शिंदे,बाजीराव ओंबळे तसेच विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर कृष्णा शंकरराव उर्फ तात्या कदम यांचे काल १६ जानेवारी रोजी निधन झाले आहे.