जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल

0
311

हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) – जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेत दमदाटी केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जानेवारी 2022 आणि त्यानंतर वेळोवेळी सुस येथे घडली.

सुनील उत्तम ससार (वय 45, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल कलापुरे, हनुमंत हिरामण भोते, साहिल सुनील चांदेरे, सुग्रीव हिरामण भोते, अक्षय सुग्रीव भोते, काळुराम मांडेकर आणि पाच महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सुसगाव येथील 145 आर हे क्षेत्र नांदणीकृत विकसन करारनाम्याने विकसनासाठी घेतले. त्यानंतर त्या मिळकतीवर आरोपींनी दहशत निर्माण करून लोखंडी ऑफिस कंटेनर ठेऊन जागेचा जबरदस्तीने ताबा घेतला. दहशत निर्माण करून फिर्यादीस जागा सोडून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना दमदाटी करून प्रोजेक्टमधून बाहेर पडा, आम्हला एनओसी द्या नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना धोका निर्माण होईल, तुमचे काही खरे नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.