जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

0
430

रावेत, दि. १९ (पीसीबी) – जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 जून रोजी रावेत येथे घडला.

कुणाल मोरेश्वर भोंडवे, महेंद्र जगन्नाथ गरड, अनिकेत मनोज चव्हाण (वय 29, रा. नवी सांगवी), विशाल माणिक गायकवाड (वय 27, रा. डांगे चौक, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कांतीलाल मोतीलाल कर्नावट (वय 67, रा. चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने आरोपींनी अतिक्रमण केले. फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली असता ही जागा कुणाल मोरेश्वर भोंडवे आणि महेंद्र जगन्नाथ गरड यांची असल्याचे सांगत अतिक्रमण सुरूच ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.