जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अकरा महिला व पाच पुरुषांवर गुन्हा दाखल

0
608

तळवडे, दि. २४ जुलै (पीसीबी) – बांधकाम साईटवरील जागेवर बेकायदेशीर रित्या अतिक्रमण केल्याप्रकरणी अकरा महिला व पाच पुरुषांवर चिखली पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.23)तळवडे येथील त्रिवेणी नगर मध्ये घडला.

गंगाधर रमेश भालेकर (वय 40 रा. तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी 11 महिला व पाच पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते. यावेळी त्यांना तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले की काही महिला व पुरुष आपल्या जागेवरून गोंधळ घालत आहेत. फिर्यादी घटनास्थळी गेले असता आरोपींनी तुम्ही काम थांबवा हा प्लॉट आमचा आहे नाहीतर आम्ही आत्मदहन करू अशी धमकी दिली. फिर्यादी यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.