जागेत अनधिकृतपणे बांधकाम

0
145

महाळुंगे, दि. १८ (पीसीबी)

एका व्यक्तीच्या जागेत तिघांनी अनधिकृतपणे बांधकाम केले. याबाबत जाब विचारला असता व्यक्तीला शिवीगाळ करत दमदाटी केली. ही घटना 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत कुरुळी गावात घडली.

दीपक शरद कांबळे आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश राजू पाचारणे (वय 32, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या जागेत बांधकाम केले. याबाबत फिर्यादी यांनी जाब विचारला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी केली. तसेच तुला पाहून घेईन अशी धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.