वाकी खुर्द दि. 6 (पीसीबी) – परस्पर विरोधात गुन्हे दाखल
जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. ५) दुपारी वाकी खुर्द येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत परदेशी, विक्रम श्रीकांत परदेशी, नियती शिंदे आणि इतर २० ते २५ महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची वडिलोपार्जित जमीन वाकी खुर्द येथे आले. जमिनीच्या वादातून आरोपींनी फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. मारहाणीत फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन गहाळ झाली आहे.
याच्या परस्पर विरोधात श्रीकांत परदेशी यांनी फिर्याद दिली असून शरयू आवटे, गौरव आवटे, एक महिला आणि इतर तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित जमिनीत येऊन आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.