जागेचा बेकायदेशीर ताबा

0
22

सहा जणांवर गुन्हा दाखल

रावेत, दि. 5 (पीसीबी)
जागेवर बेकायदेशीर ताबा घेतल्या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी पुनावळे येथे घडली.

बी के डेव्हलपर्स आणि त्यांचे अनोळखी लोक, चार महिला आणि जगन्नाथ साधू कुदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कौस्तुभ भालचंद्र राडकर (वय ४२, रा. एरंडवणा, पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुनावळे येथे ७१ गुंठे जागा आहे. त्यामध्ये आरोपींनी अनधिकृतपणे प्रवेश केला. फिर्यादी यांच्या कामगारांना खोलीत जबरदस्तीने बसवले. जागेच्या बाजूला लावलेले पत्र्याचे कंपाउंड तोडून आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान केले. फिर्यादी यांच्या ५७ गुंठे जागेवर आरोपींनी कंपाउंड करून बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेतला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.