जागा खरेदीत 25 लाख रुपयांची फसवणूक

0
311

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) – जागा खरेदी करून जागा मालकाला पैसे दिले. मात्र जागा मालकाने रजिस्ट्रेशन न करता 25 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 फेब्रुवारी 2013 रोजी आकाशीया या प्रोजेक्टमध्ये कासारसाई हिंजवडी येथे घडली.

हरीश वेणुगोपाल (वय 48, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाशीया या प्रोजेक्टतर्फे मालक के शब्बीर बाबू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीकडून सहा हजार 456 चौरस फूट जागा 26 लाख रुपयांना खरेदी केली. जागेच्या रजिस्ट्रेशन बाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली. आरोपीने एक लाख रुपये परत करून उर्वरित 25 लाख रुपये परत न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.