जागा खरेदीत ५१ लाखांची फसवणूक

0
399

तळेगाव दाभाडे, दि. २३ (पीसीबी) – कायदेशीरपणे खरेदीखत केलेली जागा पुन्हा खरेदीखत केली. त्यात ५१ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ८ जून २०१६ ते २२ जुलै २०२२ या कालावधीत सोमाटणे गाव, तळेगाव दाभाडे येथे घडला.

तनेज सुधीर वाडीकर (रा. नवी सांगवी), प्रमोद राघोबाजी उरकूडकर (रा. भोसरी), नितीन देवराज ढवळे (रा. भोसरी), इतर जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दादासाहेब शिवाजी जगताप (वय ३७, रा. च-होली, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. \

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या सहका-यांनी अगोदर कायदेशीरपणे खरेदीखत केलेल्या जागेचे आरोपींनी संगनमत करून पुन्हा खरेदीखत केले. त्यात फिर्यादी आणि त्यांच्या सहका-यांची प्रत्येकी सात लाख ३१ हजार याप्रमाणे ५१ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.