जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ४५,००० हून जास्त विद्यार्थी आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांची मिरॅकल ऑफ माइंड ॲपला मान्यता

0
13

कोईमतूर , दि . ११ ( पीसीबी ) : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ईशा फाऊंडेशनने देशभरात २०० ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ध्यान सत्रे आयोजित केली, ज्यात ४५,००० हून जास्त लोक सहभागी झाले. सद्गुरूंनी सुरू केलेले ‘मिरॅकल ऑफ माईंड’ हे ७ मिनिटांचे विनामूल्य ध्यान ॲप आहे, जे लोकांना त्यांच्या आंतरिक कल्याणाची जबाबदारी घेण्यास सक्षम करते.

राज्यभरातील ईशा स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या या सत्रात अग्रगण्य शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट्स यांचा सहभाग होता, ज्यामध्ये पुण्याहून महाराष्ट्र एडुकेशन सोसायटीचे वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, छ. संभाजीनगर येथून सरकारी विज्ञान संस्था आणि नागपूर येथून नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) यांचा समावेश आहे. विद्यार्थी, शिक्षक, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि इतर विविध क्षेत्रातील व्यक्ती या ध्यान सत्रांमध्ये सहभागी झाले.

“या प्रसंगी सोशल मीडिया एक्स वर बोलताना सद्गुरू म्हणाले, “आपले मन हे आपले काम आहे – आपले प्राथमिक काम. मानवी मन हे पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि अभूतपूर्व साधन आहे. ते सर्वात आश्चर्यकारक शोध आणि तांत्रिक प्रगतीमध्ये प्रकट होऊन मानवी कल्पकतेचे एक मानक बनले आहे. तथापि, जगभरातील सर्व मतभेद, संघर्ष आणि मानवतावादी संकटे हे देखील मानवी मनाचीच निर्मिती आहे.”

“या #जागतिकमानसिकआरोग्य दिनानिमित्त, आपण या भव्य साधनाची – आपल्या मनाची – जबाबदारी घेण्यासाठी वचनबद्ध झाले पाहिजे जेणेकरून त्यामुळे साधले जाणारे कल्याण क्षमतेनुसार सभोवतालच्या जगात अनेक चमत्कार प्रकट करेल. मनाच्या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी आपण दररोज ७ मिनिटे गुंतवण्याचा संकल्प करूया,” असेही सद्गुरू पुढे म्हणाले.

“आपला समाज जास्त सरवायवल फोकस झाला आहे आणि त्याचा परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर होत आहे. आपल्याला सर्व काही एकाच वेळी करावे लागत आहे, पण जर बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊ नये असे वाटत असेल, तर ह्यावर एकमेव सर्वोत्तम मार्ग म्हणजे ‘मिरॅकल अँप’ ध्यान, जे सद्गुरुंनी आपल्या सर्वांना संजीवनीच्या रूपात (जीवनरेषा) म्हणून दिले आहे,” असे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रमोद रावत जी म्हणाले, ५० वर्षांच्या व्यावसायिक सेवेनंतर जे गेल्या ७ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात सेवा देत आहेत.

हे ॲप अशा गंभीर काळात आले आहे, जिथे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नवीन माहितीनुसार १ अब्जाहून अधिक लोक मानसिक आरोग्य विकारांसह जगत आहेत, ज्यामध्ये चिंता आणि नैराश्य यासारख्या अवस्थांमुळे मोठा मानवी आणि आर्थिक फटका बसत आहे. भारतासाठी परिस्थिती तितकीच चिंताजनक आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या (NCRB) माहितीनुसार २०१३ ते २०२३ दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये ६५% वाढ झाली आहे.

हार्वर्ड संशोधकांनी सकारात्मक मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी सुचवलेले हे ॲप आज जगभरातील लाखो लोकांना तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक कल्याणासाठी मदत करत आहे आणि ते ध्यानाचा परिवर्तनकारी प्रभाव अनुभवत आहेत. सद्गुरूंचे हे शक्तिशाली मार्गदर्शित ध्यान दिवसभरातील फक्त ७ मिनिटांचा नियमित सराव, अगदी व्यस्त वेळापत्रकातही स्थापित करण्यासाठी तयार केले आहे.

वर्षानुवर्षे ध्यान करणारी व्यक्ती असो किंवा पहिल्यांदाच प्रयत्न करणारे असोत, हे ॲप सर्वांसाठी डिझाइन केले आहे. वापरकर्ते स्वतःच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात आणि प्रत्येक दिवसांच्या गुणांसह गती वाढवू शकतात, तसेच ध्यान करण्याच्या प्रक्रियेत कॉईन्स आणि बॅज देखील मिळवू शकतात. AI-संचलित नवकल्पनेने सज्ज अशा या ॲपमध्ये “Ask Sadhguru” हे खास वैशिष्ट्य आहे, जे प्रत्येक ध्यानकर्त्याच्या आवशक्यतेनुसार सद्गुरूंचे कालातीत ज्ञान प्रदान करते.

महाशिवरात्री २०२५ ला लॉन्च झालेल्या ‘मिरॅकल ऑफ माईंड’ ॲपने रिलीझ होताच अवघ्या १५ तासांतच ChatGPT, TikTok, Facebook आणि Instagram यांचा सुरुवातीच्या डाऊनलोड्सना मागे टाकत १० लाख डाऊनलोड्सचा टप्पा पार केला. या ॲपने सध्या Android आणि iOS वर २.८ दशलक्ष डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे आणि Play Store वर ४.८ आणि App Store वर ४.९ रेटिंग मिळवली आहे.

हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आणि ध्यानाच्या अनुभवासाठी भेट द्या: isha.co/mom