जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

0
61

दि.२७(पीसीबी)-केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट पिंपरी विभागाच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना आणि स्वागत शारदा पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. पूजनाचे व सन्मानाचे औचित्य ज्येष्ठ फार्मासिस्ट रामदास तांबे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी विवेक तापकीर यांनी मार्गदर्शनपर भाषणात ऑनलाईन फार्मसीचे धोके व त्यावरील उपाय यावर प्रकाश टाकला. तसेच फार्माकोव्हिजीलन्स (औषध सुरक्षा निरीक्षण) या विषयाची महत्त्वपूर्ण माहिती देऊन फार्मासिस्ट समाजाचे जबाबदारीचे भान पटवून दिले.

कार्यक्रमास फार्मासिस्ट किरण निकम, प्रशांत कदम, परविंदरसिंग बाध, ऋषीकेश जुंदरे, गणेश पवार, स्वप्नील जंगम, शितल पिसाळ, अर्चना विश्वकर्मा, सिमा सुतार, स्नेहल दोरगे, ललित पाटील, सुहास जाधव, आदित्य गचांडे, राजश्री पाटील, अमित कोठावदे, संदीप गावडे, सुनील कुदळे, अमित पवार, निलेश अमृतकर, राहुल फनेपुरे, सागर देवासी, निखील जगताप, सुहास सूर्यवंशी, आशिष कदम, सचिन दोरगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारोपात स्वप्नील जंगम यांनी आभार मानले. कार्यक्रमामुळे फार्मासिस्टच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक ठळकपणे समोर आली.