जवाहर कोटवाणी यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर…..

0
415

पिंपरी,दि. ४ (पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे
दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा “पिंपरी चिंचवड समाजभूषण” पुरस्कार यावर्षी पिंपरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहर किशनचंद
कोटवाणी यांना जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (दि.६ जून) पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते जवाहर कोटवाणी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे आहे अशी माहिती दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी शनिवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की, सोमवारी (दि.६ जून) सकाळी ९ वाजता दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी गावातील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच नवमहाराष्ट्र विद्यालयात सकाळी ९:३० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन, १० वाजता मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत तपासणी करून चष्म्याचा नंबर काढून देण्यात येणार आहे. तसेच एएसजीआय हॉस्पिटलचे डॉक्टर्स सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. सर्व उपस्थितांना पर्यावरण पूरक कापडी पिशव्या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहेत. यावेळी बाळासाहेब वाघेरे, हनुमंत वाघेरे, बिपिन नानेकर, ऋषिकेश वाघेरे, सोमनाथ कुदळे, हेमंत भरेकर, सुरेश झिटे,संतोष गोलांडे, स्वप्निल सुर्वे, प्रशांत वाघेरे आदी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

यावेळी युवा नेते पार्थ पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे पाटील, ॲड.
गौतम चाबुकस्वार,
माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, योगेश बहल, दत्तात्रय वाघेरे
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर सुमनताई पवळे, मंगलाताई कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, डब्बू आसवानी, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, संतोष कुदळे, निकिता कदम, श्यामाताई शिंदे, उषाताई वाघेरे, गिरीजा कुदळे, माई काटे, अरुण बोऱ्हाडे, रामआधार धारिया, शांतिसेन, हरेश बोधानी, हरेश आसवानी, हनुमंत नेवाळे, माधुरी मुलचंदानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघेरे, यशवंत साखरे, शिवाजी वाघेरे आदींसह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जवाहर किशनचंद कोटवानी हे पिंपरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी आहेत. सिंधी समाजाची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय सिंधू सभेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच पिंपरी चिंचवड सोशल फाऊंडेशनचे संचालक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एएनपी केअर फाऊंडेशनचे देखील ते संचालक आहेत. या वयातही ते साधू वासवानी मिशन मध्ये सेवादार म्हणून सेवा करीत आहेत. प्रियदर्शनी सोशल ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत. तसेच दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्टला मोतीबिंदू तपासणीचे मोफत भव्य शिबीर ते आयोजित करीत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचा “पिंपरी चिंचवड समाजभूषण” पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रतिष्ठाने यापूर्वी रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, माजी महापौर आर. एस. कुमार, राष्ट्रीय खेळाडू गोपाळ देवांग, डॉ. रामचंद्र देखणे, राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ कामगार नेते जे.सी. पिल्ले, शहाजी माने, कोरोना काळात अविरत सेवा करणारे डॉ. रोहन काटे, डॉ. विनायक पाटील यांचाही “पिंपरी चिंचवड समाज भूषण” पुरस्कार देऊन सन्मान केला आहे अशी माहिती संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी दिली.