जरांगे माजला आहे, त्याची भाषा मग्रुरीची आहे…

0
2

मुंबई, दि. २६ : मनोज जरांगेंना आझाद मैदानात पुढील दोन आठवडे आंदोलन करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालायने दिला आहे. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. जरांगे माजला आहे, त्याची भाषा मग्रुरीची आहे, त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल अशा शब्दात सदावर्दे यांनी टीका केली. मनोज जरांगे, तू आता आंदोलन करु शकत नाहीस असं आव्हानही सदावर्तेंनी दिलं.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईंमध्ये आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. पण त्यापूर्वीच मनोज जरांगेंना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “मुंबईला जो कुणी अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल त्याला कायदा त्याची जागा दाखवेल. मनोज जरांगेंना आंदोलनासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जरांगे यांच्याकडून महिलांबाबत चुकीच्या शब्दात टीका केली जाते. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आम्ही रितसर पोलिसांकडे तक्रार दिली होती. न्यायालयातही अर्ज केला होता. मनोज जरांगे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत.”

जरांगेंचे आंदोलन दिसत असलं तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. जरांगे कुणाच्या तरी हातातील बाहुले आहे. यापुढे त्याचे कोणतेहा बेकायदा कृत्य चालणार नाही असा इशारा सदावर्तेंनी दिला. किती माजलाय तो जरांग्या, त्याची भाषा मग्रुरीची आहे. जरांगेला अटक होणे आणि त्याला कायदा कळणे यानंतरच त्याला समजेल असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाही
मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला गणपती घेऊन मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला. मात्र त्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जरांगेंना धक्का बसल्याचं दिसून आलं. जरांगेंच्या मोर्चाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेवर सनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिलेत. मनोज जरांगेंना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

दरम्यान, आंदोलनासाठी नवी मुंबई, खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकतं. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून दोन आठवडे मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही असं मत कोर्टानं नोंदवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईत धडक देण्यावर ठाम आहेत. गणपतीच्या काळात मोर्चा टाळावा यासाठी सरकारकडून देखील जरांगेंशी चर्चा सुरू आहे.