जरांगे पाटील यांची पदयात्रा दिनांक 24 रोजी पिंपरी चिंचवड मध्ये दाखल होणार

0
155

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)-गेल्या पाच महिन्यांपासून पासून मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलन करत आहे,आरक्षणाची मागणी मान्य करतो मराठा समाजास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देतो आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेतो.मराठा व कुणबी दाखले असणाऱ्या मराठा नातेवाईक सगे सोयरे यांना सरसकट कुणबी दाखले देणे यासाठी मार्ग काढतो अशी विविध आश्वासने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारने वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांना दिली परंतु आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा शेवटचा व निर्णायक टप्पा जाहीर केला आहे.

मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला जरांगे पाटील व लाखों मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून दिनांक 20 जानेवारी रोजी मुंबईकडे यायला निघणार आहेत.सदर पदयात्रा व त्यांच्याबरोबर असणारे वाहने यांच्यासह लाखो आंदोलक जरांगे पाटील यांचे बुधवार दिनांक 24 रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे.ही पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे येणार आहे. तिथून पुढे रक्षक चौक,जगताप डेअरी,काळेवाडी फाटा,डांगे चौक,पदमजी पेपर मिल मार्गे चाफेकर चौक चिंचवडगाव येथे हि पदयात्रा येणार आहे. तिथून पुढे चिंचवड स्टेशन,खंडोबा मंदिर,आकुर्डी,निगडी,भक्ती शक्ती समुह शिल्प,तळेगाव मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत.अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.

आज बुधवार दिनांक 17 रोजी चिंचवड येथील कै.दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळा येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न झाली यावेळी प्रकाश जाधव,नकुल भोईर,राजाभाऊ गोलांडे,सतीश काळे,मारुती भापकर,वैभव जाधव,वसंत पाटील,मीरा कदम, संपतराव जगताप,सुनिता शिंदे, राजेंद्र चिंचवडे,भूपेंद्र गावडे, विजय काकडे,शशिकांत आवटे, निखिल गणूचे,जयराम नाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात जरांगे पाटील व आंदोलकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे सदर पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहेत.सदर पदयात्रा वाहतुकीस कोणताही अडथळा न येता पार पडावी जागोजागी आंदोलकांना जेवण पाकिटे व पाणी बॉटल यांची व्यवस्था करावी यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना,सामाजिक मंडळे,मराठा हितचिंतक व दानशूर व्यक्तींनी आपाआपल्या परिसरात पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजास सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

यावेळी आरोग्य विषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून खाजगी डॉक्टर्स व सरकारी दवाखान्यां मार्फत जागोजागी आरोग्य मदत केंद्र ही उभारली जाणार असल्याचे ठरविण्यात आले. शहरातून लाखों मराठा बांधव जरांगे पाटील यांच्याबरोबर आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्वांनी वैभव जाधव मो -7744015984 आणि मीरा कदम 9309066791 यांच्याकडे नाव नोंदणी करावी तसेच आरोग्य सुविधा केंद्र व जेवण पाणीपुरवठा स्टॉल उभारणी करणाऱ्यांनी प्रकाश जाधव मो – 9822401748 सतीश काळे 9881030007 नकुल भोईर 7588874712 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

उत्तम नियोजन व्हावे यासाठी विविध कमिट्या यावेळी बनवण्यात आल्या शहरातील विविध भागात यासाठी मीटिंग घेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले सूत्रसंचालन वैभव जाधव यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार नकुल भोईर यांनी मानले.