जयश्री थोरात, खासदार वाकचौरेंसह 50 जणांवर गुन्हा दाखल, आचारसंहिता भंग केल्याचा ठपका

0
96

संगमनेर, दि. 26 (पीसीबी) : संगमनेरमधील वादग्रस्त प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. वाहनांचे नुकसान करून विखे समर्थकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब थोरातांच्या बंधुंसह निकटवर्ती कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 109 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. दुसऱ्या प्रकरणात आचासंहितेत आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे. थोरात तांबेसह मविआचे एक खासदार आणि दोन उमेदवारांसह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

आचारसंहिता असताना जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये महिला नेत्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेत बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरांतांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर थोरातांचे समर्थक आक्रमक झाले त्यांनी सुजय विखेंच्या गाड्यांची तोडफोड केली. वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल होताच जयश्री थोरात आक्रमक झाल्या आहेत. संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर महिलांसह मोर्चा काढण्यात आला आहे. जयश्री थोरातांसह अनेक महिला एकत्र आल्या आहेत. राजकीय दबावाचा वापर करून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व सामान्य महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मी घाबरत नाही. पोलिसांनी मला अगोदर अटक करावी, असं जयश्री थोरात म्हणाल्या आहेत.