जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी, सुनिल तटकरे नवीन अध्यक्ष

0
452

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांच्या जागी अजित पवार यांच्याकडून सुनील तटकरे यांची नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचंही जाहीर केलं आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उचलबांगडी करून त्या जागेवर रविवारीच सुनिल तटकरे यांची नियुक्ती केल्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज जाहीर केले.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्ष आणि चिन्हा आमच्या बरोबर आहे. त्यांना कारवाईचा काहीच अधिकार नाही. आमच्या बरोबरचे आमदारांचे भवितव्य कसे सुरक्षित राहिल याबाबतची खबरदारी आम्ही घेत आहोत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

५ जुलै रोजी पक्षाची बैठक पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले.