जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम

0
196

जम्मू, दि. २६ (पीसीबी)- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

गुलाम आझाद यांनी १६ ऑगस्टला जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानांचे पत्र पाठविले आहे. या पत्रात राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांनी सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट केली. असा आरोपी आझाद यांनी पत्रात केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले आहेत. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला. हे फारच बालिशपणाच होता. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात या घटनेचा फार मोठा वाटा होता. असा दावा आझाद यांनी केला आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते होते. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम असून त्यांनी पक्षाची अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत. यासाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता.