जमीन विक्रीच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

0
428

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – जमीन विक्रीच्या बहाण्याने व्यक्तीची चार लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे घेऊन खरेदीखत करून न देता ऑफिस बंद करून आरोपी निघून गेले. हा प्रकार 13 जून ते 13 ऑगस्ट या कालावधीत मोरवाडी पिंपरी येथे घडला.

विशाल प्रकाश बागड (वय 40, रा. मोरवाडी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिमन्यू ताराकांत चौधरी (वय ४८, रा. रावेत) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी हे जागा खरेदी करण्यासाठी जागा शोधत होते. फिर्यादी यांच्या पत्नीला ऑनलाईन कुसगाव खुर्द, कामशेत येथे जागा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात दिसली. फिर्यादी यांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली. तिथे आरोपीने फिर्यादीस चार प्लॉट दाखवून त्याची कागदपत्रे दाखवली. त्यानंतर प्लॉटची किंमत ठरवून फिर्यादीकडून चार लाख 48 हजार रुपये आरोपीने घेतले. त्यानंतर नोटराईस विसर पावती लिहून दिली. प्रत्यक्षात जागेचे खरेदीखत करून न देता त्याचे कार्यालय बंद करून आरोपी निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.