जमीन खरेदीत तीन कोटींची फसवणूक

0
291

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी) – जमीन खरेदीचा व्यवहार करून त्या व्यवहाराचे संपूर्ण पैसे न देता तीन कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 13 एप्रिल 2016 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत नेरे दत्तवाडी हिंजवडी येथे घडली.

शांताराम दत्तात्रय कुदळे (वय 61, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईरंग डेव्हलपर्स अँड प्रमोटर्सचे मालक के आर मलिक, मोहम्मद बिन शाहरुख (दोघे रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळे कुटुंबीयांची मिळकत सैरंग डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रा ली चे मालक के आर मलिक आणि त्यांचा मुलगा मोहम्मद बिन शाहरुख यांनी खरेदी केली. त्या व्यवहारातील एक कोटी 60 लाख रुपये रक्कम आरोपींनी कुदळे यांना दिली. उर्वरित तीन कोटी 10 लाख रुपये देण्यासाठी आरोपींनी धनादेश दिले. मात्र ते धनादेश बाउन्स करून पैसे न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.