जमीन खरेदीच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाची 25 लाखांची फसवणूक

0
421

जमीन खरेदी करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाची 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 ऑक्टोबर 2023 ते 24 जून 2024 या कालावधीत रावेत येथे घडला.

नामदेव शंकर पोटे (वय 75, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब दत्तात्रय गवारे (वय 50, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवारे यांनी रावेत मधील 40 गुंठे जमीन पोटे यांना खरेदी करून देण्याबाबत समजुतीचा करारनामा केला. त्यासाठी गवारे यांनी पोटे यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना जमीन खरेदी करून न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.