जमिनीवर झोपतात, फक्त नारळपाणी पितात; 11 दिवसांच्या अनुष्ठानासाठी PM मोदींचे कठोर व्रत

0
225

अयोध्या, दि. १८ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. सोहळा भव्य होईल अशाप्रकारची तयारी सुरु झाली आहे. सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अकरा दिवसांचे व्रत्त ठेवलं आहे.

नवी दिल्ली- २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. सोहळा भव्य होईल अशाप्रकारची तयारी सुरु झाली आहे. सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अकरा दिवसांचे व्रत ठेवलं आहे. यादिवशी मोदी जमिनीवर झोपत आहेत. अन्न-पाण्याला हात लावत नाहीयेत. दिवसभर फक्त ते नारळाच्या पाण्यावर राहत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी १२ जानेवारीपासून व्रत सुरु केलं आहे. मोदी म्हणाले होते की, देवाने मला सर्व भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून प्राण प्रतिष्ठेसाठी निवडलं आहे. ही गोष्ट लक्षात घेत मी ११ दिवसांचे अनुष्ठान करणार आहे. या अनुष्ठानासाठी मोदी यांनी ११ दिवसांचे व्रत ठेवलं आहे. इंडिया टूडेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांसाठी ‘यम नियम’ पाळण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये उल्लेख केलेले सर्व नियम ते कठोरपणे पाळत आहेत. यम नियमांचा उल्लेख अनेक पुराणग्रंथात आहे. यानुसार सकाळी सुर्योदयाच्या पूर्वी उठणे, ध्यानधारणा करणे, सात्विक अन्न घेणे, योगा करणे अशा गोष्टींचा समावेश असतो.

राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापणा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्याआधी १६ जानेवारीपासून विविध पूजा विधी केल्या जात आहेत. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष न्रिपेंद्रा मिश्रा यांनी सांगितलं की बुधवारी राम लल्लाची मूर्ती गर्भगृहात आणण्यात आली आहे. आज राम लल्लांची स्थापना करण्यात येणार आहे. उद्घाटच्या आधीपर्यंत राम मंदिरात विविध विधी पार पडणार आहेत.