जमिनीच्या वादातून भावावर खुनी हल्ला

0
348

माळवाडी, दि. ९ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून भावाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी भावाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहा वाजता माळवाडी काळूस येथे घडली.

महादेव सुदाम गायकवाड (वय 40, रा. माळवाडी काळूस, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश विलास गायकवाड (वय 26), विलास सुदाम गायकवाड (वय 55), एक महिला (सर्व रा. माळवाडी काळूस, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना आरोपींनी जमिनीच्या कारणावरून दगडाने, काठीने बेदम मारहाण केली. यांना गावात जिवंत ठेवायचे नाही. यांना एकदाच ठार करा, असे म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या डोक्याला आणि खांद्यावर मार लागला. तर त्यांच्या मुलाच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.