जमिनीच्या वादातून भावाला मारहाण

0
354

किवळे, दि. २८ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून भाऊ आणि त्याच्या मुलाने भावाला आणि त्याच्या मुलाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २६) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास किवळे येथे घडली.

हनुमंत पांडुरंग दांगट (वय ५५, रा. किवळे गावठाण), मुलगा अनिकेत हनुमंत दांगट अशी जखमींची नावे आहेत. हनुमंत यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदकुमार पांडुरंग दांगट (वय ६३), शिवाजी नंदकुमार दांगट (वय २७, रा. किवळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमंत यांचा भाऊ नंदकुमार याने जमिनीच्या वादाच्या कारणावरून हनुमंत यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. नंदकुमार याचा मुलगा शिवाजी याने फिर्यादी यांचा मुलगा अनिकेत याला लाकडी दांडक्याने डोक्यात, हातावर मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.