जमिनीच्या वादातून परस्पर विरोधी गुन्हा दाखल

0
136

दि. 12 ऑगस्ट (पीसीबी) –
जमिनीच्या जुन्या वादातून दोन कुटुंबामध्ये मारामारी झाली असून परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 11) भुजबळ वस्ती वाकड,मुळशी येथे घडली आहे.

पहिल्या घटनेत कौस्तुभ दिलीप भुजबळ (वय 26 वाकड, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाणे फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी विठ्ठल भुजबळ, दिनेश भुजबळ, अजित भुजबळ, निलेश भुजबळ, संतोष भुजबळ व पाच महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे विठ्ठल भुजबळ यांनी गाडीचा हॉर्न जोरात वाजवला या किरकोळ कारणावरून तसेच जमिनीच्या जुन्या वादातून फिर्यादी व त्यांचा भाऊ अनंता यांना शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचा भाऊ आनंद यांना लाकडी दांडके रॉड व पाईपने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या तक्रारीत विठ्ठल भुजबळ यांनी फिर्याद दिली असून अनंत भुजबळ , कुशाबा भुजबळ, महातू भूजबळ, व सात महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच निलेश ला पकडून मारहाण केली तसेच शिवीगाळ केली तसेच महिलांना देखील मारहाण केली. यावरून हिंजवडी पोलिसांनी परस्पर विरोधात गुन्हा दाखल केला आहे,