जमिनीची मोजणी करण्यास प्रतिकार केल्याने जीवे मारण्याची धमकी

0
481

कासारसाई, दि. १७ (पीसीबी) – जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रतिकार केल्याने पाच जणांनी तिघांना कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. १६) सकाळी साडेसात वाजता कासारसाई येथे घडली.

सुरज लोखंडे आणि अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शब्बीरभाई करीमभाई मुलाणी (वय ५९, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारसाई येथील सर्व्हे नंबर १९ येथे फिर्यादी यांच्या मालकीची जमीन असून आरोपी तिथे येऊन फिर्यादी यांच्या मालकीची जमीन मोजू लागले. तेंव्हा फिर्यादी व त्यांच्या दोन भावांनी आरोपींना प्रतिकार केला. त्यावरून आरोपी सुरज लोखंडे याने फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून ‘आम्ही जमीन विकत घेतली आहे. आम्हाला जमिनीचा ताबा घ्यायचा आहे. आमची अडवणूक केली तर इथे रक्त सांडेल’ अशी धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.