जबरी चोरी, वाहनांची तोडफोड प्रकरणी तिघांवर गुन्‍हा

0
84

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) निगडी,
दोन मित्रांना मारहाण करून लुटण्‍यात आले. तसेच परिसरातील 19 वाहनांची तोडफोड करण्‍यात आली. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे साडेबारा ते एक वाजताच्‍या दरम्‍यान ओटास्‍कीम, निगडी येथे घडली.

अमरसिंग जुन्‍नी, जसमितसिंग जुन्‍नी आणि त्‍यांचा साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. तेजस गणेश कांबळे (वय 24, रा. आझाद चौक, ओटास्‍कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेबारा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी तेजस आणि त्‍यांचा मित्र अकबर शेख हे दोघेजण ओटास्‍कीम, निगडी येथे बोलत उभे होते. त्‍यावेळी तिथे आलेल्‍या आरोपींनी फिर्यादी व त्‍यांचा मित्र यांना शिवीगाळ करीत धमकी दिली. अनोळखी आरोपीने फिर्यादी यांचे हात धरून ठेवले. आरोपी अमरसिंह जुन्‍नी याने त्‍यांच्‍याकडील कोयता उलटा करून फिर्यादी यांना मारला. फिर्यादी यांच्‍या खिशातील एक हजार रुपये जबरदस्‍तीने काढून घेतले. त्‍यानंतर आरोपींनी कोयता व पालघन हवेत फिरवून आरडा ओरडा करीत शिवीगाळ करीत परिसरातील 19 वाहनांची तोडफोड करीत दोन लाख रुपयांचे नुकसान केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.