जनावरांचे मांस विक्री प्रकरणी एकास अटक

0
421

मावळ, दि. १७ (पीसीबी) – जनावरांचे मांस विक्री प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. त्याच्याकडून दोन लाख 40 हजार रुपयांचे मांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 15) पुणे- मुंबई महामार्गावर ओझर्डे गाव येथे करण्यात आली.

आशिष कमलाकांत बारीक (वय 25, रा. सूर्योदय वेल्फेअर सोसायटी, अशोक नगर, घाटकोपर) यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो चालक मेहबूब शमशोद्दीन मैदरगीकर (वय 45, रा. रमाबाई नगर, रावेत) यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा टेम्पो चालक आहे. दरम्यान शनिवारी आरोपी त्याच्या टेम्पोतून दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे गोमांस घेऊन जात होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी आरोपीकडून दोन लाख 40 हजार रुपयांचे गोमांस तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण पाच लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.