जनहित याचिकेनुसार विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पाणी पुरवठ्यासाठी आता वार्डस्तरीय बैठकांचे नियोजन

0
2

दि.१०(पीसीबी) – मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका निकालातील आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षएत्रातील पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी आता वार्डस्तरीय बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. १३ ते २१ एप्रिल दरम्यान अशा पाच बैठका होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

पाणी पुरवठा समस्या आणि उपाययोजना यासंदर्भात २७ मार्च २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार आता पदाधिकारी, नगरसदस्य, हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी यांचे समवेत या बैठका होणार आहेत. नागरिकांच्या तक्रार आणि उपाययोजना असा बैठकिचा विषय आहे.
१३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता निगडी येथील महापालिका अ प्रभाग कार्यालय, सायंकाळी ५ वाजता नेहरुनगर येथील क प्रभाग कार्यालयात बैठक होईल. १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता चिंचवडगाव येथील ब प्रभाग कार्यालय आणि सायंकाळी ५ वाजता भोसरी येथील इ प्रभाग कार्यालयात होईल.
१६ एप्रिल रोजी रहाटणी येथील ड प्रभाग कार्यालयात दुपारी ३ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता निगडी चौक येथील फ प्रभाग कार्यालयात बैठक आहे. २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता थेरगाव येथील ग प्रभाग कार्यालत आणि सायंकाळी ५ वाजता कासारवाडीच्या ह प्रभाग कार्यालयात बैठकीचे नियोजन आहे.