जनतेचा पर्यावरण जाहीरनामा महानगरपालिका निवडणूक २०२६

0
14

दि.०५(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार हा जनतेपर्यंत निवडणुकीत मत मागताना काही आश्वासन देत असतो की मी या प्रभागासाठी असे काम करेन तसे काम करेन पण आता काळ थोडा बदलला आहे आता आपण मागणी करू शकतो की आम्हाला या गोष्टी हव्या आहेत जर आपण या पूर्ण करणार असाल तर आम्ही आपल्याला मत देऊ आणि एक पर्यावरण प्रेमी म्हणुन चला तर मग पर्यावरण संबधी आपली मागणी आपल्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांन पर्यंत पोहचवूया आणि फक्त मागणी न करता येणाऱ्या ५ वर्षांत त्याचा पाठपुरावा करूया.

मुख्यतः या मागण्या खालील प्रमाणे असतील पण सगळ्यात महत्त्वाचे पालिकेची पर्यावरण आपत्कालीन मदत कक्षाची स्थापना (Emergency helpline Number for Environment) ही असेल व इतर मुद्दे जसे
१. जल
२. वायु
३. ध्वनी
४. वृक्ष
५. कचरा

जलनीती –
१. लोकांना योग्य प्रमाणात स्वच्छ पाणी आणि समान वाटप
२. पाणी पुनःवापर साठी प्रोत्साहन (करामध्ये सुट)
३. प्रत्येक सोसायटी मध्ये जल पुनर्भरण
४. पाण्याचा अवैध वापर आणि बोअरवेल वर नियंत्रण
५. पाणी बचतीसाठी एक विशेष समिती
६. प्रत्येक घराची व सोसाटीची सांडपाणी वाहिका ही मुख्य वाहिनीशी जोडलेली असेल
७. नदीमध्ये कुठेही उगम ते पालिका हद्द यामध्ये मैला मिश्रित पाणी किंवा रासायनिक पाणी सोडले जाणार नाही
८. प्रत्येक प्रभागात STP आणि औद्योगिक वसाहतीत ETP असेल
९. पाण्याची गळती यावर अवलोकन आणि गळती थांबण्यासाठी विशेष काळजी
१०. पाण्यासंबंधी जनजागृती साठी विशेष प्रयत्न.
११. पालिका हद्दीत शहरी जल पुनर्भरण साठी विशेष प्रयत्न.

वायुनिती –
१. शहरातील हवेची गुणवत्ता तपासणीसाठी यंत्रणा
२. शहरात सायकल वापर व इंधन बचतीसाठी प्रयत्न
३. पालिकेतर्फे चालणारी सर्व वाहने CNG वर चालवणे
४. शहरात लाकूड व कोळसा वापरावर नियंत्रण
५. शहरात कचरा जाळणे व शेकोटी यावर निर्बंध
६. औद्योगिक कचरा उघड्यावर टाकणे व जाळणे यावर प्रतिबंध
७. पालिका हद्दीत अति प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक कारखान्यावर प्रतिबंध
८. सार्वजनिक वाहतूक वाढवणे व car आणि bike pool ला प्रोत्साहन
९. शहरात हरित क्षेत्र वाढवणे
१०. शहराचे एकूण तापमान कमी करण्यासाठी उपाययोजना करत AC चा वापर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न.
११. लोकांमध्ये वायुप्रदूषण आणि मानवी आरोग्य यासंबंधी जनजागृती व कृतीआराखडा
१२. Mechnical Sweeper मशीनचा वापर बंद करणे
1३. बांधकाम प्रकल्प माध्यमातून होणारे प्रदुषण थांबवण्यासाठी नियमांचे कडक पालन

ध्वनीनिती –
१. ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी यंत्रणा उभारणे
२. WHO च्या मार्गदर्शक नियमानुसार शहरातील ध्वनी प्रदूषण हे ६५ db पेक्षा कमी ठेवणे
३. सामूहिक ठिकाणे तसेच सामूहिक कार्यक्रम व धर्मस्थळे इथे ध्वनी मर्यादा व वापर नियंत्रित करणे
४. मुख्य रहदारीच्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष वृक्षारोपण करणे
५. औद्योगिक ध्वनी प्रदूषण यावर नियंत्रण
६. हॉर्न च्या अतिवापर आणि अतिकर्कश वापरावर निर्बंध
७. ध्वनी प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर जनजागृती
८. शाळा, हॉस्पिटल आणि रहिवासी भागात ध्वनी शोषक यंत्रणा बसवणे.

वृक्षनिती –
१. वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना १९७५ च्या कायद्यानुसार करणे
२. वृक्ष कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे
३. शहरातील वृक्ष गणना योग्य पद्धतीने करणे व प्रसिद्ध करणे
४. वृक्षांची संख्या आणि प्रकार निश्चित करणे
५. शहरातील वृक्षरोपन हे स्थानिक प्रजाती आणि जैवविविधता यांचा विचार करून व्हावा
६. शहरातील हरित क्षेत्र मोजणी व आवश्यक हरित क्षेत्र वाढवणे
७. वृक्ष पुनः रोपणला प्राधान्य देणे व कमीत कमी झाडं तोडण्यासाठी परवानगी देणे
८. झाडांची छाटणी ही देखील शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब व अवैध वृक्षतोडीवर फौजदारी कारवाही
९. नदी काठावर मोठ्या प्रमाणात वृक्षरोपन
१०. वृक्ष संग्रहालय ही संकल्पनेसाठी विशेष भर
११. वृक्ष वनस्पती आणि मानवी जीवन यांच्यातील महत्व व लोकमत तयार करण्यासाठी जनजागृती

कचरानिती –
१. मानवी जीवनशैलीतील बदल आणि कचरा उत्पत्ती कमी करणे
२. कचऱ्याचे ७ स्तरावर वर्गीकरण करणे
३. प्रत्येक प्रभागात कंपोस्टिंग प्लांट उभारणी
४. कंपोस्टिंग करणाऱ्या प्रत्येक घराला आणि सोसायटी ला मिळकत करत 10% सुट
५. ओल्या कचऱ्यापासून गॅस व वीज निर्मितीसाठी उपाययोजना
६. प्लास्टिक वर पुर्ण बंदी
७. कापडी पिशवी वापरणाऱ्या वर भर
८. प्लास्टिक पाणी बाटली वर नियंत्रण
९. हॉटेल्स मध्ये फूड वेस्ट कमी करण्यासाठी प्रोत्साहन
१०. कचरा वेचक कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे
११ इ-कचरा साठी मूल्यांकन प्रणाली विकसित करून लोकांना आर्थिक मोबदला मिळवून देणे.
१२. Adar Poonawala यांच्या सारख्या NGO च्या माध्यमातून शहर कचरा मुक्त करणे
१३ औद्योगिक कचरा व्यवस्थापन यासाठी प्रक्रिया प्रकल्प.

प्रशांत राऊळ
Green Army Pimpri Chinchwad
9881880029