जनता जुन्या चेहरा बाजूला ठेवून नवीन चेहऱ्याला संधी देते – सचिन अहिर

0
159

पुणे, दि. १६ (पीसीबी) – “मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पहिले जाहीर करावं की ते नेमकं कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. गजानन बाबर यांची समजूत घालून नवीन चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून बारणेंना संधी दिली गेली होती. मात्र आता मावळ लोकसभेसाठी स्थानिक लोकांचा विचार करणारा, शहरीकरणाला सामोरे जाऊ शकतो, असा उमेदवार दिला जाईल. उमेदवार दिल्यानंतर जनता जुन्या चेहरा बाजूला ठेवून नवीन चेहऱ्याला संधी देतील,” असा दावा ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला. ‘मावळ लोकसभेवर पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचाच खासदार होणार,’ असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.

‘संजोग वाघेरे यांना पक्षाने जिल्हा संघटक मावळ लोकसभेची जबाबदारी दिली आहे. या पूर्ण भागाची संघटन जबाबदारी दिलेली आहे. कमी वेळात त्यांनी जनसंपर्क वाढवून पक्ष वाढीचे काम सुरू केले आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याबद्दलची एक आपुलकी वाढू लागली आहे. मात्र उमेदवारी बाबतचा निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील,’ असे अहिर यांनी नमूद केले. ते लोणावळ्यात मावळ लोकसभा पूर्वतयारी बैठकीत बोलत होते.
|
भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अहिर यांनी टिका केली. ‘गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदार संघात खासदार निवडून येईल की नाही याच्याकडे लक्ष द्यावे. मावळ लोकसभा ही पारंपरिक दृष्टिकोनातून शिवसेनेकडे असलेली लोकसभा आहे. आम्हाला खात्री आहे की रायगड मधील विधानसभा मधून मिळणारी आघाडी ही यावेळी पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभेमधून देखील मिळेल, असा विश्वास आहे. विशेषता मावळमध्ये पण एक मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला मानणारे नागरिक आहेत. त्यामुळे यावेळी देखील शिवसेना ठाकरे गटाचा खासदार मावळ लोकसभेवर निवडून येईल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी लोणावळ्यात व्यक्त केला. मावळ लोकसभा पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या’मातोश्री’वर घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती, यावर अहिर म्हणाले, ‘तुम्ही कोणाबद्दल बोलावं आणि किती बोलावं यालाही मर्यादा आहे. ‘मातोश्री’ला टार्गेट केलं जातं. काही तपास यंत्रणाच्या माध्यमातून रिपोर्ट येत असतात. त्यामुळे कुणी काय बोलावे, यावर मर्यादा असाव्यात, असे मत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केले.