जगात कोणत्याही क्षणी उडणार तिसऱ्या महायुद्धाचा भडका? 40000 सैन्य तैनात

0
2

दि.१२(पीसीबी) – युरोपमध्ये पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, रशियानं आमच्यावर मिसाईल हल्ला केला, असा दावा पोलंडने केला होता, त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे, रशियाचे चार मिसाईल आम्ही पाडले असंही पोलंडने म्हटलं होतं. त्यानंतर या वादात अमेरिकेनं देखील उडी घेतल्याचं पहायला मिळालं. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशिया आणि बेलारूसमध्ये मोठी संयुक्त सैन्यांची कवायत होणार आहे. जापाद-2025’ (Zapad-2025) असं या कवायतीला नाव देण्यात आलं आहे.

मात्र या सैन्य कवायतीपूर्वीच पोलंडनं आपल्या पूर्व सिमेवर तब्बल 40,000 सैनिक तैनात केले आहेत. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी जगाला मोठा इशारा दिला आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर आता जग पहिल्यांदाच तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे.

गेल्या आठवड्यात रशियाकडून तब्बल 19 वेळा पोलंडच्या हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यात आला होता, ही घटना म्हणजे युद्धाला उसकवण्याचं निमंत्रण आहे, असं पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर टस्क यांनी आता नाटो (NATO) ची आर्टिकल 4 प्रक्रिया देखील सुरू केली आहे, ज्या अंतर्गत नाटोचे सदस्य एकत्र येऊन सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करतात, सोबतच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं देखील पोलंडच्या मागणीवरून अपातकालीन बैठक बोलावणार असल्यांच जाहीर केलं आहे.

काय आहे जापाद 2025?

जापादचा अर्थ पश्चिम असा होता, दर चार वर्षांनी रशिया आणि बेलारूस संयुक्तपणे विशाल सैन्य कवायतीचं आणि अभ्यासाचं आयोजन करत असतात. या माध्यमातून रशिया आपल्या सैन्य शक्तिचं प्रदर्शन देखील करतो. मात्र यावेळी या सैन्य कवायतीपूर्वीच युरोपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पोलंडवर हल्ला झाल्यानंतर ट्रम्प यांनी देखील पुतिन यांना असं न करण्याबाबत इशारा दिला होता. सध्या युरोपमध्ये प्रचंड अशांतता असून, युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.