जगातील सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती …..

0
245

सातारा, दि.१२(पीसीबी) – आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आजचा दिवस महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रा साठी दुग्धशर्करा योग.वय फक्तं एक आकडा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मिलिंद धोंडीबा रासकर वय वर्ष फक्त 48 मूळचे अहिरे या सातारा जिल्ह्यातील छोट्या गावातील रहिवासी परंतु स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्ती चे जोरावर शून्यातून विश्व निर्माण करून ऑटो मोबाइल इंडस्ट्री मध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

स्वतःचा व्यवसाय सांभाळत वाइल्ड लाईफ फोटोग्राफी, गिर्यारोहणा हे छंद जोपासला आहेत नुसते छंद जोपासले नाहीत तर त्यातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला आहे. जगातील सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे सर करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बनले आहेत.

त्यांच्या या सेवन समिट चे मोहिमेच्या सुरुवात झाली ती जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट (उंची 8848 मीटर)शिखर सर करण्यापासून अती उंची मुळे हवेतील ऑक्सीजन चे अत्यल्प प्रमाण,खुंबु सारखे death झोन , अचानक पणे येणारे हिम वादळ या सर्वांवर मात करीत त्यांनी दिनांक 22/5/2019 रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले.त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि सूरू झाला सेव्हन समिट च प्रवास दिनांक 22/08/2019 रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रस (उंची 5642 मीटर)हे शिखर सर केले.त्यानंतर लगेचच दिनांक 21/09/2019 रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमंजारो (उंची 5895 मीटर) हे सर केले.

दिनांक 27/01/2020 रोजी दक्षिण अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट अकांकागुआ (उंची 6961 मीटर) हे सेव्हन समिट मधील एव्हरेस्ट नंतर सर्वाधिक उंचीचे शीखर सर केले.
त्यानंतर ऐन कोरोना चे काळात ज्यावेळी अनेक देश विदेशी लोकांना आपल्या देशी येवू देण्यापासून कचरत होते अश्यावेळी मजल दर मजल करीत दिनांक 29/06/2021 रोजी अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट देनाली (उंची 6194 मीटर) हे शिखर सर केले.

डिसेंबर 2021 खरतर त्याच वेळी सेव्हन समिट करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती झाले असते त्यावेळी त्यांनी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आणि सोबतच अंतर्तिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट विन्सन मासिफ सर करण्याचा बेत आखला होता त्यानूसार दक्षिण ध्रुव सर केला ही पण काही अनपेक्षित कारणामुळे त्यांना विन्सन मसिफ सर करता आले नाही.
त्यानंतर त्यांनी 29/09/2022 रोजी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट कोजीअस्को (उंची 2248 मीटर) हे शिखर सर केले.दिनांक 3/12/2022 अखेर तो दिवस उजाडला अंतर्तिक खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट विन्सन मासिक (उंची 4892 मीटर) शिखर सर झाले .आणि एक नाव महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि जगाच्या गिर्यारोहणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले गेले मिलिंद धोंडीबा रासकर जगातील सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती.