जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदीच पहिले

0
156

– अमेरिका, जर्मनी, जपानचे नेते एकदम पिछाडीवर

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. मॉर्निंग कन्सल्ट सर्वे या कंपनीनं केलेल्या सर्व्हेक्षणात नरेंद्र मोदींना ७५ टक्के रेटिंग मिळालं आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, जर्मनी आणि जपानच्या नेत्यांना पिछाडीवर टाकलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ टक्के रेटिंगसह पहिलं स्थान पटकावलं आहे. मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्यूएल लोपेझ ओब्रॅडोर यांचा क्रमाक आहे. तर, तिसऱ्या स्थानावर इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा क्रमांक आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षांना ६३ टक्के तर इटलीच्या पंतप्रधानांना ५४ टक्के रेटिंग मिळालं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. तर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे ४१ टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. २२ देशांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एकदा टॉपवर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ हे सहाव्या स्थानावर आहेत. तर, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा ३८ टक्के रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत.

मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था जगभरातील सरकारं आणि नेत्यांच्या कामगिरीचा आढावा आणि सर्व्हेक्षण करुन रेटिंग जाहीर करते. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, जर्मनी, भारत, मेक्सिको, नेदरलँडस्, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि अमेरिका या देशांमध्ये कार्यरत आहे. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था जगभरात दररोज २० हजारहून अधिक मुलाखतीचं आयोजन करते. रेटिंग जाहीर करताना या संस्थेकडून सात दिवसांच्या सरासरी आकडेवारीचा आधार घेतला जातो. अमेरिकेत जवळपास ४५ हजार जणांची मतं जाणून घेतली जातात. तर, इतर देशांमध्ये ५०० ते ५ हजार जणांची मतं नोंदवून घेतली जातात.