जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी इंडो ऍथलेटिक्स सोसायटीतर्फे मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन

0
107

वडगाव मावळ, दि. ५ (पीसीबी) – रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी जुन्या मुंबई पुणे महामार्गाशी संलग्न वडगाव मावळ येथे आय ए एस तर्फे सर्व लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी मोफत मुक्काम व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. देश-विदेशातील सायकल स्वार भारत भ्रमण करत असताना त्यांना अशा मोफत व्यवस्थेचा खूप फायदा होतो, तसेच प्रोत्साहन मिळते . आय ए एस च्या कैक सायकलिस्टनी संपूर्ण भारतभर सायकल भ्रमण केले असता मोफत मुक्काम करण्यासाठी उत्तम सोयींचा अभाव प्रकर्षाने जाणवला.

या अनुभवातून बोध घेत मागील आठ वर्षापासून भारत सरकारच्या अतिथी देवो भव वसुधैव कुटुम्बकम या मोहिमेची मूल्ये जपत आय ए एस संस्थेतर्फे भारत भ्रमण करणाऱ्या देश-विदेशातील २०० हुन अधिक सायकलिस्ट्सची पुण्यात तसेच राज्यात अनेक ठिकाणी मुक्कामासाठी मोफत सेवा पुरवलेली आहे.

वडगाव मावळ येथील सोयी मुळे यात अजून एका ठिकाणाचा समावेश झाला. वडगाव येथील ठिकाणाच्या उद्घाटन प्रसंगी IASचे मुख्य सल्लागार अजयजी दरेकर, प्रमोदजी म्हाळसकर, सुनीलजी चव्हाण यांनी या ठिकाणची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे, भविष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आय ए एस संस्थेतर्फे सांगण्यात आले.

आजपर्यंत आय ए एस संस्थेमार्फत लांब पल्ल्याच्या पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते गोवा, पुणे ते हम्पी, पुणे ते गुजरात-सोमनाथ (६००-१६००KM)अशा ग्रुप राईड्स यशस्वीपणे आयोजित केल्या गेल्या आहेत. १००हुन अधिक सायकलिस्टना एकत्र घेऊन अशा प्रकारच्या लांब पल्ल्याच्या राईड्स चे आयोजन करणारी आय ए एस हि एकमेव अग्रगणी संस्था आहे. भारत सरकारची संकल्पना अतिथी देवो भव ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकलिंग क्षेत्रात आपल्या संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे

वडगाव येथील ठिकाणाचे उद्घाटन प्रसंगी गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, गिरीराज उमरीकर, संजय साठे, युवराज पाटील, संदीप परदेशी, गणेश जाधव, नारायण औटी, सोपान औटी, निवेश घाडगे, पंकज मुनोली, मदन शिंदे, सुनील चाकू, समीर दोशी, बळीराम शिंदे, योगेश परंडवाल, विजयकुमार सर्जिने उपस्थित