जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचं निधन

0
3

 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालं आहे.

वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. आज सकाळी 11 वाजता गुरुग्राममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राम सुतार यांनी केवळ महाराष्ट्र किंवा भारतात नाही, तर जगभरात 200 हून अधिक शिल्पं बनवली आहेत. त्यांच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अतिशय भव्य शिल्प उभारत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषणसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.