जगताप, लांडगे, खापरे, गोरखेंकडून देवाभाऊंचे अभिनंदन

0
56

मुंबई, दि. ५ – राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या चारही आमदारांनी सागर बंगल्यावर प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले. आमदार शंकरशेठ जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे यांनी बुधवारी रात्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे थोड्या उशिराने तिथे पोहचले आणि त्यांनीसुध्दा फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, भाजप गटनेता निवड प्रक्रीयेच्या वेळी विधीमंडळात चारही आमदारांनी एकत्र येत फोटोसेशन केले. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र विधिमंडळ बैठकीसाठी, तसेच पक्षनेता निवडीच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी विधान भवनामध्ये आमदार महेशजी लांडगे, आमदार शंकरजी जगताप, आमदार उमाताई खापरे, आणि आमदार अमित गोरखे यांची उपस्थित होती.