पिंपळे गुरव, दि. ०२ (पीसीबी) : पिंपळे गुरव येथील पै. नरेश जगताप यांच्या साठ वर्षापासून बैल जोडीची मिरवणूक काडून बैल पोळा साजरा करत आहेत. सध्या आधुनिकीकरणामुळे आणि स्मार्ट सिटी झाल्याने घराचे दर गगनाला भिडलेले आहेत नागरिकांना गाडी लावण्यासाठी जागा शिल्लक राहीलेली नाही तर जनावरे पाळणे दूरच राहिले. आम्ही सर्जा राजाची जोडी फक्त हौसे खातर पाळत असून सध्या शेती शिल्लक राहिलेली नसल्याने बैलासाठी वेगळी जागा केली असून सर्जा राजाचा स्वभाव गरीब असून आमच्या बायका पण त्याची देखभाल करत असतात असे पै.नरेश जगताप यांनी सांगितले .
जगताप म्हणाले की नातवंडे हि एरवी बैलांच्या पाठीवर बसुन खेळतात सर्जाराजा लहान मुलांना कुठलीही इजा करत नाही .माझी पत्नी सुरेखा ,सुनबाई श्वेता, मुलगा सौरभ,भाऊजय मंगल जगताप सह कुणाल, ओंकार, गौरव,सुनील जगताप ,दत्तात्रय जगताप,सर्व कुटुंबातील सदस्य सर्जा राजाची वर्षभर काळजी घेतात आणि बैलपोळ्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो.