छ्ठ पूजा उत्सवात सर्व सोयी सुविधा पूरवा..

0
71

समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांची पालिका प्रशासनासह पोलिसांकडे मागणी..

उत्तर भारतीय बांधवानी मोठ्या प्रमाणात उत्सवात सहभागी व्हावे..

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : उत्तर भारतीय बांधवांचा छ्ठ पूजा उत्सव पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्साहात उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. प्रामुख्याने शहरातील पवना नदी घाटावर पारंपारिक पद्धतीने छठ देवतेची पूजा मनोभावे केली जाते. प्रामुख्याने या उत्सवाला गुरुवारी (दि. ७) बडकी छठ आणि शुक्रवारी (दि. ८) पारण या दोन दिवशी मोठ्या जत्रेचे स्वरूप येत असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था, विजेची सोय, पाणी पुरवठा, अग्निशामक वाहन तसेच डेकोरेशनची व्यवस्था आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशी मागणी हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी निवेदनात म्हटले आहे की, ”पिंपरी चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून उत्तर भारतीय बांधव वास्तव्यास आहेत. हे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करतात. चिंचवडगावातील पवना नदी घाटावर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. या आयोजनात छठ पूजा समिती अध्यक्ष जितेंद्र क. गुप्ता, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, उपाध्यक्ष देवानंद आर. गुप्ता, सचिव अशोक डी. गुप्ता, सदस्य जितेंद्र जे. गुप्ता, प्रेम शंकर राय फिल्म प्रोड्युसर, विकास मिश्रा अध्यक्ष, पूर्वाचल विकासमंच, मुन्ना डी. गुप्ता, अनिल एस. गुप्ता, उमा के. गुप्ता, सचितानंद मिश्रा, टी. एन. तिवारी, सुभाष एम. गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मदन आर. गुप्ता, पप्पु डी. गुप्ता, सुजित एम. गुप्ता, शंकर गुप्ता, शंभू गुप्ता, रमेश गुप्ता, भोला बी. गुप्ता, मनोज आर. गुप्ता, राजेश जे. गुप्ता, विनोद गुप्ता, संतोष गुप्ता यांचे मोलाचे योगदान असते.

दरम्यान गुरुवारी (दि. ७) बडकी छठ आणि शुक्रवारी (दि. ८) पारण या दिवशी विधीपूर्वक मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पवना नदीच्या घाटावर भव्य गंगा आरती, पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने या धार्मिक उत्सवासाठी पुढाकर घेऊन चिंचवडगावातील पवना नदी घाट आणि पिंपरी चिंचवड शहरातील इतर घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था, विजेची सोय, पाणी पुरवठा, अग्निशामक वाहन तसेच डेकोरेशनची व्यवस्था करावी. जेणेकरून हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा करता येईल”, असे या निवेदनात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे.