छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकऱणात धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करा

0
42

भोसरी, दि. ०३ (पीसीबी) : मोशी येशील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या संदर्भातील ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन, मुर्तीकार राम सुतार, सल्लागार व संबंधित अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

निवेदनात वाघेर म्हणतात, नुकत्याच मालवण येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर
मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे भाग गेले दोन वर्षे मोशी येथे नियोजित जागी पडून आहेत. त्यातील महाराजांच्या मोजडीला तडे गेले आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले गेले नाही आपण फक्त पुतळ्यासाठी बत्तीस कोटी चौऱ्यांशी लाख रुपये खर्च करत आहोत मात्र पुतळ्याला वापरण्यात आलेले ब्राँझ निकृष्ट दर्जाचे असल्याने पुतळ्याच्या मोजडीला तडे गेले आहेत. त्यामुळे या पुतळ्याच्या कामाचे ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन मुर्तीकार राम सुतार, सल्लागार, शहर अभियंता मकरंद निकम, तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय घुबे, तत्कालीन उपअभियंता व विद्यमान कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार आणि संबंधित अभियंते, अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा.

मोशी येशील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा ठेका अनुभव नसतानाही धनेश्वर कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिला गेला त्याने शितलबाग येथील सत्तर लाखांचा पादचारी पुल साडेसात कोटींवर नेला होता. त्यामुळे आही या ठेकेदाराला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम देण्यात येवू नये म्हणून ९/६/२०२० रोजी पत्र दिले होते. मात्र राजकीय दबाव तसेच आमदाराच्या दबावामु‌ळे हे काम धनेश्वर ला दिले गेले मात्र आज रोजी पुतळ्याची जागा बदलली गेली आहे. त्यामुळे पालिकेला पाच कोटीचा भुर्दंड झाला आहे. मात्र त्याच जागी गेल्या दोन वर्षापूर्वी हा छत्रपतींचा संभाजी महाराजांचा पुतळा बसवला असता आणि मोजडीला किंवा इतर भागाला तडे गेले असते किंवा मालवणच्या पुतळ्यासारखी एखादी दुर्दैवी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असते…? सुदैवाने तसे झाले नाही. मात्र आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा संशय आम्हाला आहे.

शिल्पकार राम सुतार यांना ३२ कोटी ८४ लाख रुपये रक्कम ठरलेली आहे. पुतळा अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवला आहे त्यामुळे संबंधित ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन, मुर्तीकार राम सुतार, सल्लागार, शहर अभियंता मकरंद निकम तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय घुबे, तत्कालीन उपअभियंता तथा विद्यमान कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, आणि यांच्यावर कर्तव्यात कसूर केला म्हणून तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसे न केल्यास आम्हाला महापालिका आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जावे लागेल. आयुक्त महोदय आपण लवकरात लवकर कारवाई कराल हीच अपेक्षा.