छत्रपती शिवाजी महाराज स्मारक थेरगाव येथील परिसर गार्डनिंग, पेविंग ब्लॉक दुरुस्तीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला सुरवात

0
277

शिवसेना विभाग प्रमुख आकाश बारणे व विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कुणाल पवार यांच्या मागणीला यश

थेरगाव दि.२७(पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक थेरगाव गावठाण येथील स्मारक परिसर गार्डनिंग व पेविंग ब्लॉक दुरुस्तीकरण व सुशोभीकरण तसेच रंग रंगोटी करण्याचे काम थेरगाव शिवसेना विभाग प्रमुख आकाश बारणे व विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कुणाल पवार यांच्या संयुक्त पाठपुराव्याने स्थापत्य विभागाच्या वतीने काम चालू करण्यात आले आहे.

स्मारक परिसरामध्ये दर रविवारी शिवभक्त मोठ्या संख्येने जमा होउन शिववंदना घेतली जाते सदर वेळी परिसरामध्ये खचलेले ब्लॉग व धुळीचा होणार साम्राज्य सामोरे जावे लागते बजरंग दल विश्व हिंदू परिषद व थेरगाव शिवसेनेच्या वतीने स्थापत्य विभाग यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.