पिंपरी दि.१९ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राजनीतिज्ञ, युध्दनितीनिपुण तर होतेच शिवाय ते सर्वांना समान वागणूक व न्याय देणारे जगातील आदर्श राजे होते,त्यांच्या महान कार्याचा, युध्दकौशल्याचा अभ्यास जगभरातील इतिहासाचे तज्ञ व अभ्यासक करतात याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
निगडी येथील भक्ती शक्ती चौक उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाची सुरूवात करण्यात आली, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
यावेळी माजी नगरसदस्य मारूती भापकर, सचिन चिखले,क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता नितिन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे,सागर तापकीर आदी उपस्थित होते.
त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय भवनातील प्रतिमेस तसेच शहरातील पिंपरी वाघेरे, रहाटणी चौक, एच.ए.कॉलनी पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, लांडेवाडी चौक भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,एच.ए.काॅलनी येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुलक्षणा धर कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे,तर दापोडी व फुगेवाडी येथील कार्यक्रमांस माजी नगरसदस्य संजय काटे,स्वाती उर्फ माई काटे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी थेरगाव गावठाण, डांगे चौक थेरगाव आणि प्रेमलोक पार्क चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,यावेळी क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे,कार्यकारी अभियंता बाळू लांडे, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे,लिपिक मंगेश इंगळे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
उप आयुक्त राजेश आगळे यांनी भोसरी येथील पीएमटी चौक, मोशी, चऱ्होली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी नाना मोरे,मुख्य लिपिक किसन केंगले,अभिजित डोळस उपस्थित होते.
अ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे यांनी मोहननगर चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी नगरसदस्य मारूती भापकर,सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.