छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दुबईत उत्साहात साजरी

0
377

दुबई, दि. २५ (पीसीबी) -दुबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच व सत्यशोधक दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धक शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंतीचे हे दहावे वर्षे होते. यावेळी पुरोषोत्तम खेडेकर, इंद्रजित सावंत,गंगाधर बनबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुबईत ज्ञानवर्धक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवराय मनामनात,शिवजयंती घराघरात या संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील ७५ देशांत साजरी करण्यात आली. दुबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच आणि सत्यशोधक दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धक शिवजयंतीचे आयोजन सलग १० व्या वर्षी करण्यात आले. यावेळी अबुधाबी,शारजाह,अजमान, फुजेराह,रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवजयंतीसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि पुरोगामी विचारवंत गंगाधर बनबरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते होते. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. विक्रम भोसले व मुकुंदराज पाटील यांनी शिवगर्जना दिली. पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवचरित्रातून प्रबोधन – काल, आज, उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. बनबरे यांनी सत्यशोधक आणि आपण याविषयी दुबईकरांचे प्रबोधन केले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शिव-शाहू विचार काळाची गरज या विषयी मार्गदर्शन केले. आशिष जीवने यांनी सत्यशोधक कार्याची माहिती दिली. सुनंदा सपकाळे व विक्रम भोसले यांनी पाहुण्यांची ओळख,सूत्रसंचालन विजयसिंह शिंदे व पंकज आवटे यांनी केले. आभार अभिजित देशमुख यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राजेश पाटील, विजयसिंह शिंदे,संतोष सपकाळे,निखिल गणूचे,दीपक जोगदंड,जितू सपकाळे,जयंत रंगारी, रामेश्वर कोहकडे,अमोल कोचळे,पंकज आवटे यांनी केले.