छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने अडवल्याचा व्हिडीओ, अजितदादा संतापले

0
561

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – आंध्र प्रदेशमधील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने अडवण्यात आल्याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. एका व्यक्तीने फेसबुकला शेअर केलेल्या व्हिडीओत महाराजांची मूर्ती असल्याने चेकपोस्टवरुन पुढे जाऊ दिलं नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान विधानसक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून निषेध व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय आहे व्हिडीओत –
सुरेश पाटील नावाच्या व्यक्तीने २२ जून रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी “मी आज तिरुपतीहून तिरुमाला येथे जात होतो. मात्र चेकपोस्टवर माझी कार चेक करण्यात आली. यावेळी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कारमधून काढण्यास सांगितलं. नाही काढली तर तुम्ही कार वरती नेऊ शकत नाही, असं मला तेथील अधिकाऱ्याने सांगितले. मी त्यांना विनंती केली पण त्यांनी नकार दिला,” असा दावा सुरेश पाटील या व्यक्तीने केला होता.