छत्रपती संभाजी राजेंचे वढू बुद्रुक येथे स्मारकासाठी आंदोलन करणार .
पिंपरी दि. २७ (पीसीबी) – स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक वढू तुळापूर येथे होणार असून या विकासाराखड्यासाठी २६९ • ३४ कोटी रुपयांचा भरीव निधी माजी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर करून अर्थसंकल्पात मंजुरी दिली ,मात्र राजकारण म्हणून छत्रपती संभाजीच्या स्मारकाचे काम थांबवण्याचे काम शिंदे -फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहे . या कामाचे पुन्हा सादरीकरण करा म्हणून स्मारक गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे .हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून हा छ. संभाजी राजेंचा व संभाजी भक्तांचा घोर अवमान असून जनता अशा प्रकारच्या प्रवर्तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.
कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र बांधकाम कामगार महासंघातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . छत्रपती संभाजीराजांचे स्मारक व्हावे यासाठी आंदोलन करण्याचा निश्चय करण्यात आला. छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिमेस निगडी येथे पुष्पहार अर्पण करून राजेंचा नामघोष करण्यात आला.याप्रसंगी आबा शेलार, राजेश माने, नाना कसबे ,ओम प्रकाश मोरया, फरीद शेख,तुकाराम कदम,कासिम तांबोळी, सहदेव होनमाने आदी उपस्थित होते .
नखाते म्हणाली की ” स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी बलिदान दिले ते बलिदान स्थळ म्हणजे शौर्य स्थळ तेथे मोठ्या अभिमानाने मराठी बांधवांचा अभिमान उंचावेल असे जागतिक कीर्तीचे स्मारक करण्याचा निर्णय मा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रयत्नातून डिसेंबर महिन्यात मंजूर करण्यात आला .सदरच्या कामाला मंजुरी दिलेली असताना अशी स्थगिती देणे व त्याचे परत सादरीकरण करावे असे म्हणजे सध्याचे सरकार हे प्रतिशोधाची भावना ठवणारे आहे काय ? अशी शंका निर्माण होते आहे सदरच्या स्थगितीचा निर्णयाचा पुनर्विचार करून तातडीने स्मारकाच्या कामात सुरुवात करून सर्व शिवभक्तांची संभाजी भक्तांची मागणी पूर्ण करावी अन्यथा संभाजी भक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत.
सदरचे स्मारकासाठी निधी देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डिसेंबर महिन्यात मंजुरी देताना नमूद केले ” की छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याच्या ,त्यागाचा, आणि पराक्रमाचा भव्य इतिहास जनतेसमोर मांडला जाईल, महाराजांचा दैदिप्यमान इतिहास व ते स्मारक ऐतिहासिक स्वरूपाचे बांधकाम आणि जागतिक कीर्तीचे असेल सदरच्या कामासाठी २६९.३४ कोटीचा एवढा भरीव निधी देण्यात आला .सन २०२५ पूर्णत्वास येईल.”