– ‘हिंदू तितुका मेळवावा’ व्याख्यान
– परिसरातील शिवभक्तांची व्याख्यानात मोठी उपस्थिती
काळेवाडी, दि. 22 (पीसीबी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारा बलुतेदार आपापली कामे करत असत. परंतु महाराजांनी हाक दिली की हातातली कामे सोडून सैन्यात सामील होत असे. निवडणूक म्हणजे आधुनिक काळातील युद्धच आहे. आपल्याला महाराजांच्या स्वप्नातील राष्ट्र घडविण्यासाठी १०० टक्के मतदान करायलाच हवे, असे मत हिंदुत्ववादी व्याख्याते आणि अभ्यासक आनंद रायचूर यांनी व्यक्त केले.
अखिल काळेवाडी रहाटणी शिवजयंती उत्सव समिती तर्फे
पिंपरी परिसरातील बालाजी लॉन्स येथे आयोजित ‘हिंदू तितुका मेळवावा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर दत्ताभाऊ नढे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलतांना रायचूर म्हणाले, आजवरचा इतिहास आहे की हिंदू जिथे बहुसंख्याक असतो, तिथे तिरंगा अभिमानाने फडकत असतो. परंतु ज्या भागात हिंदू अल्पसंख्यांक होतो आणि मुसलमान बहुसंख्याक होतो, तिथे तिरंगा फडकावता येत नाही. हिंदू वर्धिष्णू झाला तरच संविधान टिकणार आहे. ” संविधानाच्या रक्षणासाठी मुसलमानांनी आधुनिक होणे गरजेचे आहे. देश विघातक विचारांतून बाहेर पडत त्यांनी मानवजातीच्या कल्याणाचा विचार करायला हवा. फक्त राज्यघटनाच हा विचार त्यांच्यात रूजवायला हवा, असे मतही रायचूर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण सोंजे, सूत्रसंचालन समर्थ राऊत, सोमनाथ गोडांबे तर आभार संतोष जगताप यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश कदम, सुहास भुतेकर यांच्या सह अखिल शिवजयंती समन्वय काळेवाडी रहाटणी समिती कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
रायचूर म्हणाले, मुस्लिमांनी आधुनिक आणि बुद्धिवादी होण्याची गरज, झापडबंद अवस्थेतून त्यांनी बाहेर पडावे.
वक्फ कायद्यातील ४४ सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिमांचेच भले होणार आहे. राष्ट्र हिताचे काम करणाऱ्यांनाच मतदान करा. भारत देशच माझं करिअर आहे, असे म्हणणारेच विद्यार्थी घडवावे. राजकारण्यांनी मुस्लिमांना चूचकारण्यासाठी राष्ट्र विरोधी निर्णय घेऊ नये.