छगन भुजबळ कृषीमंत्री होणार

0
9

दि २१ ( पीसीबी ) – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं कोकाटेंच्या आमदारकीसह मंत्रीपदावर टांगती तलवार असल्याची कुजबूज राजकीय गोटात सुरु आहे. अशातच दुसरीकडे नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी ठोठावली. माणिकराव कोकाटे यांना अवघ्या दोन तासात जामीन देखील मंजूर झाला. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत.
न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशाच, नवा कृषीमंत्री कोण असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, भुजबळांचे नाव चर्चेत आलं आहे.